Your browser does not support JavaScript!

तुमचे शब्दसामर्थ्य वाढवा - विद्याधर कात्रे

तुमचे असे होते काय?

... इंग्रजी पुस्तक वाचताना एकेक वाक्य तीनतीनदा वाचावे लागते.
... बोलणार्‍याचे इंग्रजी समजते, पण अर्धेमुर्धे. पुरते न समजल्यामुळे गोंधळायला होते.
... इंग्रजी लिहिताना शब्द आठवत नाहीत, म्हणून उत्तर ठाऊक असून लिहिता येत नाही.
... इंग्रजी बोलता येते – पण कसेबसे. धडपडत, अडखळत, कोलमडत.
... किंवा मनात वाक्यांची जुळवाजुळव करीस्तोवर ते बोलायची वेळ टळून जाते.

तर मग तुमचे दुखणे एकच आहे. तुमच्याजवळ इंग्रजीचे पुरेसे शब्दभांडार नाही. निराश होऊ नका. असे होत असेल, तर हे पुस्तक तुम्ही वाचले पाहिजे. ते खास तुमच्यासाठी लिहिलेले आहे.

तुमच्याजवळच्या इंग्रजी शब्दांच्या खजिन्यात त्यामुळे मोठी भर पडेल. तुमचा आत्मविश्र्वास वाढेल. शब्दावाचून अडखळणे, निरुत्तर होऊन गांगरणे हे संपून जाईल.

लेखनात, संभाषणातही परिणाम साधता येईल, चमक दाखवता येईल. इंग्रजीबद्दलची भीती जाऊन त्याऐवजी हुरुप येईल. – आणि हे फक्त चार आठवड्यात घडून येईल. तुम्ही फक्त उमेद धरायची आहे, नेटाने पुढे जायचे आहे. चला, तर मग.