Your browser does not support JavaScript!

माझं चीज कोणी हलवलं ? - स्पेन्सर जॉन्सन  Translator : मोहन माडगूळकर

डॉ. स्पेंसर जॉनसन हे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लोकांना आयुष्य अधिकाधिक यशस्वी व तणावमुक्त होण्यासाठी 'टॉनिक' मिळाले आहे. अवघड विषय आणि समस्यांवर सोपी आणि उपयुक्त उत्तरे देणारे सर्वश्रेष्ठ लेखक म्हणून ते सर्वज्ञान आहेत.

'माझं चीज कोणी हलवलं ?' ही एक सोपी बोधकथा आहे. 'बदल' या विषयीच्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारी. भूलभुलैय्यामध्ये म्हणजेच जगामध्ये सुख आणि समाधान मिळवण्यासाठी चीज शोधणार्‍या चार प्राण्यांची ही कथा आहे. चीज हे एक प्रतिक आहे आपल्याला जीवनात हव्याशा वाटणार्‍या गोष्टीचं प्रतिक भूलभलैय्या ही अशी जागा आहे जिथे आपण आपल्याला हव्याशा वाटणार्‍या गोष्टींचा शोध, घेत असतो. कथेतील पात्रं अभूतपूर्व बदलांना तोंड देतात. अखेर शेवटी त्यातला एक यशस्वी होतो आणि अनुभवातून मिळालेली शिकवणूक भूलभुलैय्याच्या भिंतीवर लिहून ठेवतो. आपण जेव्हा हे भिंतीवरील सुविचार वाचाल तेव्हा बदलांचा सामना कसा करावा हे आपलं आपल्याला लक्षात येईल. या शिकवणुकीचा परिणाम आयुष्यभर राहू शकेल.